नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : विना संस्कार, नाही सहकार ! विना सहकार, नाही उद्धार या मार्गदर्शक तत्वाने अखिल भारतीय स्तरावर ४२ वर्षे कार्यरत असणारी सहकार क्षेत्रातील विविध घटकांच्या विकासासाठी कार्यरत असणारी सहकार चळवळ अव्याहत सुरू ठेवणारी संघटना म्हणजे सहकार भारतीचा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधुन सहकार भारती, नवी मुंबई तर्फे सी वुड, नवी मुंबई येथे ही वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.या निमित्ताने नारायणराव बांदल ,माजी उपाध्यक्ष , कुर्ला नागरी सहकारी बॅंक,यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहनिर्माण संस्थांसाठी डीम कन्वेयन्स डीड या महत्वाच्या मुद्द्यावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात| नारायणराव बांदल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. नवी मुंबई महानगर अध्यक्ष कृष्णा धुमाळ यांनी कार्यक्रमा चे प्रास्ताविक केले.
नारायणराव बांदल यानी सहकार या विषयावर मार्गदर्शन केले.महानगर सेक्रेटरी अॅड. चंद्रकांत निकम यानी गृहनिर्माण संस्था, मानीव हस्तांतरण या कळीच्या मुद्द्यावर संपूर्ण लागणारे कागदपत्रे त्याची होणारी प्रत्येक टप्या चे मार्गदर्शन केले.तसेच गृहनिर्माण अनेक संस्थांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले, काही सिडको चे ताठर भूमिका बाबत एम डी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याचे ठरवण्यात आले.कार्यक्रमाची सांगता मानसी पै. यानी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण बुलाख, संघटन प्रमुख, कोकण प्रांत यांचे विशेष मार्गदर्शन, तसेच कडू, श्रीमती रश्मी शेलार , भगवान दादा पवार, वनस्पती तज्ञ आबा रणवरे, पत्रकार भालचंद्र माने, अड मोनिका गव्हाणे,अड शहा मॅडम, थोरात साहेब, जाधव साहेब, छाया वाळुंज व अनेक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोकण दर्पण.





