नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुर्भेवासीयांना देण्यात येणाऱ्या मेडिकल कार्डचा शुभारंभ गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी उपस्थितीत होते. राष्ट्रवादीचे युवानेते शिवशरण पुजारी यांच्या पुढाकाराने हा स्त्युत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नवी मनपाच्या क्षेत्रातील तुर्भे विभाग हा झोपडपट्टी वसाहतीचा आहे. येथे प्रामुख्याने गरीब, गरजू आणि अल्पउत्पन्न गटातील लोक राहतात. जेव्हा कोणी आजारी पडते तेव्हा त्यांना पालिकेच्या रुग्णालयात उपचार मिळतो, मात्र खाजगी मेडिकलमध्ये औषधांसाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवानेते शिवशरण पुजारी यांनी तुर्भे प्रभाग क्रमांक ७३ मधील आंबेडकरनगर , गणेश नगर , इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.येथील नागरिकांसाठी त्यांनी मेडिकल कार्ड तयार केले आहे.या मेडिकल कार्डच्या माध्यमातून येथील नागरिकांना तुर्भे परिसरातील मेडिकलमध्ये औषधांवर सरसकट १५ ते २० टक्के सूट मिळणार आहे. यासाठी शिवशरण पुजारी यांनी तुर्भे प्रभाग क्रमांक ७३ आंबेडकरनगर , गणेश नगर , इंदिरानगर परिसरातील मेडिकल मालकांची बैठक घेतली. त्यानुसार येथील नागरिकांना औषधांच्या खरेदीत १५ ते २० टक्के सवलत देण्याचे मेनी केले. त्यामध्ये पॉप्युलर मेडिकल ,शशिकांत मेडिकल, आनंद केमिस्ट, लक्ष्मी कृपा मेडिकल आणि जान फार्मसीचा समावेश आहे. नागरिकांना दिलेले मेडिकल कार्ड दाखविल्यानंर त्यांना सदर मेडिकलमध्ये स्वस्त औषधे देण्यात येणार आहे. तुर्भे प्रभाग क्रमांक ७३ आंबेडकरनगर , गणेश नगर , इंदिरानगर परिसरातील सर्व नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, म्हणून शिवशरण पुजारी यांनी स्वखर्चाने मेडिकल कार्ड वाटप करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सदर मेडिकल कार्डचे उदघाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवशरण पुजारी यांनी मुद्रित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ७३, तुर्भे , नवी मुंबई या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील श्री आव्हाड यांनी केले.यावेळी प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल घोगरे, व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण दर्पण.





