पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील जयहिंद क्रीडा मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरा करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन जागतिक युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जयहिंद क्रीडा मंडळाच्या वतीने यानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा खडगी , सचिव मकरंद पाटील, मुख्य प्रशिक्षक योगेश खडगी, अमर चव्हाण, शैलेश क्षीरसागर, रुपेश खडगी, अनिषकुमार ,खेळाडू तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण दर्पण.





