पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथे हलविण्यात आलेले तळोजा विभाग कार्यालय अखेर पुन्हा तळोजा येथे हलविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्प संख्यांक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फारुख पटेल यांनी पालकमंत्री अदिती तटकरे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने सदर काम मार्गी लागले आहे. त्यामुळे तळोजा वरून खारघरपर्यंत नागरिकांना करावी लागणारी पायपीट आता संपली आहे.
पनवेल महापालिका स्थापन होण्यापूर्वी तळोजा गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय होते. महापालिका झाल्यानंतर पनवेल महापालिका प्रशासनाने तळोजा गावात विभाग कार्यालय सुरु केले, मात्र ते कालांतराने खारघर येथे स्थलांतर केले. त्यामुळे तळोजामधील नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली. सदर प्रश्नाबाबत फारुख पटेल यांनी आवाज उठवून पालकमंत्री अदिती तटकरे आणि पालिका आयुक्तकडे पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी देखील तात्काळ दाखल घेऊन प्रशासनाला याबाबत आदेश दिले. प्रशासनाने याबाबत दखल घेत तळोजा येथील विभाग कार्यालय सुरु केले.
कोकण दर्पण





