नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कांँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. नवी मुंबई , पनवेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एक कोटी समस्त धनगर समाज बांधवांची अशी भावना आहे ,असे पुजारी यांनी यावेळी सांगितले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे देखील पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराजा चक्रवर्ती छत्रपती यशवंतराव होळकर यांनी मोगल साम्राज्य आणि इंग्रजांच्या विरोधात अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राजा म्हणून त्यांची ख्याती देश आणि परदेशात आहे. छत्रपती शिवरायांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे ते राजा होते. महाराजा चक्रवर्ती छत्रपती यशवंतराव होळकर हा फक्त धनगर समाजाचा नव्हे तर अखंड महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक कोटी धनगर समाजाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याची मागणी केल्याची प्रतिक्रिया मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
कोकण दर्पण





