Press "Enter" to skip to content

फिरता दवाखान्यामार्फत सीबीडीमध्ये मोफत आरोग्य तपासणी ! नगरसेविका स्वाती गुरखे यांचा पुढाकार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने नवी मुंबई मनपा सीबीडी १०२ प्रभागात फिरता दवाखान्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच माजी नगरसेवक अशोक गुरखे व माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांच्या माध्यमातून प्रभाग १०२ सीबीडी -बेलापूर विभागात मोफत फिरता दवाखान्याचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी सेक्टर ३ गणपती मंडप . बी १० /१६ च्या बाजूला सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोफत तपासणी, मोफत प्रथमोपचार, मोफत रक्तदाब-मधुमेह तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम संपूर्ण प्रभागात राबविणार असल्याची माहिती माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांनी दिली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »