Press "Enter" to skip to content

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने महिलांचा सन्मान ! मनसे महिला अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांचा उपक्रम !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्य जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नवी मुंबई शहराध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी महिलांसाठी व्याख्यान रुपी कार्यक्रम तसेच स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

भारती विद्यापीठाच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी कासारे व डॉ. राजश्री पाटील वैद्यकाय अधिकारी माथाडी हॉस्पीटल यांचा प्रमुख पाहुणे म्हणूम सहभाग होता. त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच याकार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे उपस्थित होते. यावेळी महिलांना आदर्श महिला तसेच आदर्श शिक्षिका सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले. महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोफत थायरॉईडची तपासणी याचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ऐरोली विधान सभा उपशहराध्यक्षा शुभांगी ताई बंदिछोडे, उपशहराध्यक्षा सोनिया धानके, शहर सचिव मृणालताई महाडिक, शहर सचिव सोनल भुतकी नसेच विभागअध्यक्षा शिवानी परदेसी उपस्थित होत्या. सायली कांबळे यांच्या सहकार्याने व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »