Press "Enter" to skip to content

सेंट्रल पार्क नागरिकांसाठी खुले करा – नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील सेंट्रल पार्क तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील उद्याने व खेळाची मैदाने नागरीजनसाठी खुली करावीत, अशी मागणी पनवेल मनपाच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोंना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. सिनेमागृह,मॉल,मंदिरे आता जवळपास सर्वच सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली केली आहेत. याच अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आयुक्त पनवेल महानगरपालिका यांच्याकडे खारघर शहरातील सर्वात मोठे व ज्याची जागतिक पातळीवर ओळख आहे असे सेंट्रल पार्क देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सेंट्रल पार्क हे जगातील सर्वात मोठे पार्क असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात जागा ही नागरिकांना फिरण्यासाठी, चालण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळणी देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी सामाजिक अंतर देखील राखता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी आपण सर्व सामान्य नागरिकांची मागणी लक्षात घेता खारघर येथील सेंट्रल पार्क तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील खेळाची मैदाने,उद्याने खुली करावीत जेणेकरून खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांना तिथे जाता येईल, अशी मागणी नेत्रा पाटील यांनी केली आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »