Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये श्रमदानाद्वारे नववर्षाचे स्वागत !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वच्छता जेथे, समृद्धी तेथे असे म्हणत पनवेल मनपा क्षेत्रातील खारघर विभागातील नागरिकांनी श्रमदान करून नववर्षाचे स्वागत केले. पनवेल मनपाचे खारघर प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.

२०२१ वर्षाचे स्वागत करण्यासाठी निलेश बाविस्कर यांनी स्वच्छता मोहित राबविली. स्वच्छतेतून नव्या वर्षाचा नवा संकल्प केला. यानिमित्ताने घरकुल संकुलात आणि मैदानात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये नागरिकांनीही सहभाग घेतला त्याबद्द्ल निलेश बाविस्कर यांनी नागरिकांचे अभिनंदन व आभार मानले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »