पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील पदपथांची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्याची मोहीम स्थानिक नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी हाती घेतली असून सदर मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छ भारत अभियानात आपले योगदान दिले आहे.
खारघर सेक्टर ७ मधील टॅक्सी स्टॅन्ड जवळील पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा होता. या ठिकाणी नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजप युवा सरचिटणीस अमर उपाध्याय यांनी पुढाकार घेऊन सदर पदपथांची स्वच्छता करून सुशोभीकरण केले. या उपक्रमात प्रभाग क्रमांक ५ मधील रहिवाशी, खारघर पोलीस, ए यु स्मॉल फायनान्स यांनी विशेष सहकार्य केले.
कोकण दर्पण.





