Press "Enter" to skip to content

तळोजा येथे नवीन ट्रान्स्फार्मर बसविण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : तळोजा फेज १ येथील आकसा मोहल्लामध्ये नवीन ट्रान्स्फार्मर बसवावा, अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल व सरचिटणीस रणजित नरुटे यांनी केली आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.

पनवेल मनपा क्षेत्रातील पनवेल मधील तळोजा आकसा मोहल्ला येथील ट्रान्स्फार्मर जुना झाला आहे. याबाबत वीज कंपनीकडे देखील लेखी मागणी केल्याचे शहबाज यांनी सांगितले.मात्र, सदर कामासाठी विलंब होत असल्याने राष्ट्रवादी युवकचे शिष्ट मंडळ पालकमंत्री अदिती तटकरे यांना भेटले. पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. यावेळी तळोजा आकसा मोहल्ला मधील रहिवाशी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »