पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या पुढाकाराने पनवेल शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
खांदा कॉलनीतील स्वच्छतादूतांना संन्मान करुन त्यांना फळे देण्यात आली. फेज १,तळोजा पनवेल येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. हार्डकोर जिम कामोठे,पनवेल येथे पावरलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. खांदा कॉलनी येथे गरजू ८० महीलांना ड्रेस व पुरुषांना जीन्सचे वाटप करण्यात आले. क्रीडा राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते जनता दरबारात पॉवरलिप्टिंग स्पर्धेतील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. स्पर्धा ६५ किलो खालील व ६५ किलो वरील अशा दोन वजनी गटात आयोजित केल्या गेल्या. ६५ किलो खालील वजनी गटात प्रथमेश कदम यांनी एकूण ३४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. अशिष राजपूत यांनी एकूण २४० किलो उचलून रजत पदक , गणेश कोळेकर यांनी एकूण २४० किलो वजन उचलून कास्य पदक पटकावले व वेदांत कुलये यांनी एकूण २३० किलो वजन उचलून चौथ्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
तसेच ६५ किलो वजन वरील वजनी गटात दिपक घावरी याने एकूण ३८० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले , प्रथमेश देवकर यांनी २९० किलो उचलून रजत पदक पटकावले,
पंकज वाघमारे यांनी एकूण २९० किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले .
सदर स्पर्धेतील आकर्षण राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा २०१९ रजत पदक विजेते थॉमस अँन्थनी उपस्थित होते. सदर स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून राजेश थेटे, किशोर नारकर आदींनी आपली योग्य भूमिका बजावली. सदर कार्यक्रमास पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय पनवेल शहर जिल्हा सचिव गणेश पाटील सचिव सुहास बनसोडे ,जिल्हा सचिव गोविंद मोरे ,जिल्हा सचिव अफरोज शेख, किशोर नारकर, हार्ड कोर जीमचे राजेश थेटे,प्रभाग अध्यक्ष सचिन पांचाळ, प्रभाग उपाध्यक्ष हरिस शेख, अबु सालेम, अख्तर शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण दर्पण.





