पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांवर असलेल्या गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या मारून होणाऱ्या संभाव्य अपघातांना रोखण्यासाठी स्थानिक नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
खारघर विभागातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या नसल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
खारघर सेक्टर ४ बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवर जवळपास ५ गतिरोधक आहेत. मात्र, कोणत्याही गतिरोधकांवर कुठल्याही प्रकारची सफेद मार्किंग निदर्शनास येत नसल्याने रहिवाशांसाठी अपघाती क्षेत्र निर्माण झाले होते. सदर प्रश्नाबाबत नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि समाजसेवक अमर उपाध्याय यांनी सिडकोकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, सिडको प्रशासन बरेच दिवसापासून टाळाटाळ करत होती. त्यामुळे रहिवाशांना अपघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली सर्व गतिरोधक निदर्शनास येण्यासाठी जवळपास राहणाऱ्या लहान मुलं, महिल,व् पुरुष यांच्या सहाय्यताने सफेद रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा हातभार लावला. लोक सहभागातून हर्षदा उपाध्याय व अमर उपाध्याय यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
कोकण दर्पण.





