नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नेरुळ सेक्टर १८ मधील रिक्षाचालकांना गणवेश वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भोजमल पाटील, राष्ट्रवादी युवक बेलापूर विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी युवक प्रभारी तेजस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस गौतम आगा, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर, युवक कार्याध्यक्ष सौरभ काळे, वाशी तालुका अध्यक्ष सतनाम नागपाल, नेरुळ तालुका अध्यक्ष महादेव पवार , समाजसेवक डी. डी. कोलते, जिल्हा युवक सरचिटणीस प्रशांत सोळस्कर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष जतिन धनावडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष तेजस फणसे , नेरुळ तालुकाध्यक्ष सुधीर फापाळे , जुईनगर तालुकाध्यक्ष कु हर्षद जगताप ,नेरुळ सरचिटणीस सुरज ठाकूर , तुषार ईथापे , वॉर्ड अध्यक्ष निखिल हांडे वॉर्ड अध्यक्ष ९७ हनुमंत बुरुंगले ,वॉर्ड अध्यक्ष ९६ प्रदीप कलशेट्टी , व युवक वॉर्ड अध्यक्ष ९६ धीरज सूर्यवंशी , युवक वॉर्ड अध्यक्ष ९७ मिथुन यादव , युवक कार्याध्यक्ष राहुल गायकवाड
तसेच प्रभागातील ज्येष्ठ समाजसेवक डिअर शिंदेसाहेब , देवाप्पा लवटे साहेब , कृष्णा आगोंडे, नितीन पांडे , महेश बनसोडे, राजेश शिर्के , प्रणिल उतेकर, प्रसाद पवार प्रतीक सपकाळ , रोहन म्हापणकर ,प्रशांत पानसरे, दिलीप यादव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रूपेश यादव यांनी केले.
कोकण दर्पण.





