Press "Enter" to skip to content

आगामी काळात पनवेल महापालिकेत राष्ट्रवादीचे किमान २० नगरसेवक असतील – मेहबूब शेख !

शरद पवारांच्या आवाजातील शुभेच्छांनी बहरला अभिष्ठचिंतन सोहळा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेलमध्ये आपली राष्ट्रवादीची युवा विंग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव पनवेल क्षेत्रात वाढताना दिसत आहे, त्यामुळे आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्टवादीचे किमान २० नगरसेवक तरी निवडून जातील, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघर-तळोजा येथे आयोजित केलेल्या आभिचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजातून राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरदास गवारी यांनी आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि खारघर- तळोजा येथे आयोजित केलेल्या अभिष्ठचिंतन सोहळ्याला आणखी बहर आला. आपलं मनोगत व्यक्त करताना सुरदास गोवारी यांनी शरद पवार यांच्या आवाजात बोलल्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून गेले. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा भरून आली. जणू शरद पवारच कार्यकर्त्यांच्या भेटीला आल्याचा साक्षात्कार कार्यकर्त्यांना झाला.

पनवेल महानगरपालिका जिंकण्याच्या ध्येयाने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचटणीस प्रशांत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शहबाज पटेल यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचटणीस प्रशांत पाटील, प्रदेश सचिव सुरदास गोवारी, राष्ट्रीय अल्पसंख्यांक उपाध्यक्ष फारुख पटेल, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, पनवेल शहर जिल्हा लीगल सेल अध्यक्ष पावन गायकवाड, पनवेल शहर जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष शैलेश गांगुर्डे, पनवेल शहर जिल्हा युवती अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण, पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष विजय मयेकर, पनवेल शहर जिल्हा युवक सरचिटणीस रणजित नरुटे, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम, पनवेल शहर जिल्हा युवक उपाध्यक्ष तुषार मानकर ,युवक जिल्हा उपाध्यक्ष राकेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. शहबाज पटेल मित्र मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »