Press "Enter" to skip to content

खारघरमधील मैदानांची स्वच्छता ! नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : अखेर पनवेल महानगरपालिकेने खारघर मधील खेळाची मैदाने स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील सेक्टर १९ व सेक्टर १४ येथील मैदानांची साफसफाई कारण्यात आली आहे.
स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महापालिका सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सदर कामाला सुरुवात झाली. पालिका प्रशासनाने खारघर विभाग अधिकारी दशरथ भंडारी यांना सांगून मैदानातील कचरा, गवत काढून घेतले. स्वच्छता निरीक्षक मनोज चव्हाण आणि इतर स्वछता दूतांनी सदर मोहीम पार पाडली. त्यामुळे नागरिकांना फिरण्यास सोय झाली. मुलांना खेळण्यासाठी मैदान मोकळे झाल्याने समाधान व्यक्त होतंय. नागरिकांनी नगरसेविका नेत्रा पाटील आणि समाजसेवक किरण पाटील यांचे विशेष आभार मानले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »