Press "Enter" to skip to content

युवानेता शहबाज पटेल यांचा राष्ट्रवादीतर्फे विशेष सन्मान !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला धावणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांचा राष्ट्रवादी तर्फे विशेष सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते शहबाज पटेल यांना गौरविण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांच्या कार्याची दखल घेऊन संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »