Press "Enter" to skip to content

उद्यान घोटाळा प्रकरणी नवी मुंबई मनपाचे तीन अधिकारी निलंबित !

नवी मुंबई : कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई शहरात उद्यानांची देखभाल आणि संवर्धन करण्यासाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी मनपा उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी या तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर कंत्राटदारालाही १५ दिवसात ८ कोटी ३४ लाख रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात उद्यानांची देखभाल आणि संवर्धन करण्यासाच्या कामाचा ठेका एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्याच्या व्यवहारात करोडांचा भ्रष्टाचार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून जे अधिकारी या प्रकरणात सहभागी आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.
सदर मागणीबाबत पालिका आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी या प्रकरणी १४ अधिकारी आणि कंत्राटदार याना नोटीस बजावली होती. त्यांचे उत्तर येताच सोमवारी तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
एन के शहा इंफ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराच्या माध्यमातून उद्यानात नियमबाह्य पद्धतीने खासगी सुरक्षा नेमण्यात आले आहेत.एका सुरक्षा रक्षकाला मनपाकडून प्रति २४,१४८/- रुपये देण्यात येतात.या प्रमाणे एकूण १२२ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत असे कंत्राटात नमूद करण्यात आले आहे.त्यावर कंत्राटदाराने नमो फैसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीचे (नियमबाह्य पद्धतीने) सुरक्षा रक्षक नेमले आहेत.त्या सुरक्षा रक्षकांना कंत्राट मध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम वेतन स्वरूपात देणे गरजेचे असतांना त्यात तफावत असल्याचे आढळून आले आहे. यात एका सुरक्षा रक्षकाला ८ हजार ते ९ हजार रुपये देण्यात येत आहे.बाकी रक्कम कुठे जाते याची आपणाकडून चौकशी होणे गरजेचे आहे.मे महिन्यापासून बहुतांश उद्यानात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून या रक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनात प्रति महिना १८ लाख रुपयांहून अधिक तफावत आहे.हा सर्व प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला असता यावर संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते.त्याचवेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेण्यात आली होती.त्यावेळी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार कारवाई झाल्याने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.

  • उद्यान घोटाळा हा अगदी पारदर्शक असतानाही तब्बल ८ कोटींचे बिल अदा करण्यात आल्या प्रकरणाची माहिती उपायुक्त महाले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना असतांनाही त्यात वेळकाढू धोरण राबवण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी अजून सखोल चौकशी करून आणखी काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
  • योगेश महाजन : अध्यक्ष – राजे प्रतिष्ठान कामगार सेना, ठाणे जिल्हा.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »