Press "Enter" to skip to content

भाजपा खारघरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टी खारघर-तळोजा मंडल अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भारतरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजप जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल,अनुसूचित जाती मोर्चा मंडल अध्यक्ष अनिल साबणे, पनवेल महानगरपालिका नगरसेविका आरती नवघरे, सरचिटणीस दीपक शिंदे सर, उपाध्यक्ष बिना गोगरी व रमेश खडकर,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सदस्या सीमा खडसे, रुपेश चव्हाण,प्रदीप शेलार, प्रकाश ओव्हाळ,गजेंद्र जिगे,महेश गाढे,प्रकाश नरवाडे, महेश सोनवणे,आपलं महानगराचे ब्युरोचीफ संजय महाडिक उपस्थित होते.
संपादक संजय महाडिक, मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल,सरचिटणीस दीपक शिंदे व उपाध्यक्ष बिना गोगरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विविध पैलूंना उजाळा दिला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »