Press "Enter" to skip to content

पनवेल मच्छीमार्केट बाहेर मासे विक्रीसाठी मनपाची परवानगी ! राष्ट्रवादी युवकच्या मागणीला यश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल मधील मासे विक्रेत्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मासे विक्रेत्यांना मच्छीमार्केट बाहेर व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे.

पनवेल उरण नाका येथील मच्छीमार्केट मध्ये सर्वच मासे विक्रेत्यांना मासे विक्रीचा व्यवसाय कठीण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी प्रत्येक मासे विक्रेत्यांमध्ये ६ ते ८ फुटाचे अंतर ठेवून मासे विक्रीसाठी बसावे लागत आहे. मात्र, त्यामुळे सर्व मच्छीविक्रेत्यांना मार्केटमध्ये जागा पुरत नाही. त्यामुळे अनेक मासे विक्रेत्यांना मार्केट बाहेर बसावे लागत होते. मात्र, मार्केटबाहेर बसल्याने पनवेल मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येत होती. पालिका प्रशासन मज्जाव करीत असल्याने व्यवसाय कसा करावा असा प्रश्न येथील मासे विक्रेत्यांना पडला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रणजित नरुटे यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सदर प्रश्न लेखी निवेदनाद्वारे मांडला. कोविडच्या पार्श्वभूमीवर मासेविक्रेत्यांना मार्केटबाहेर बसण्याची तात्पुरती परवानगी द्यावी, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना याबाबत सूचना केल्या. आयुक्तांनी तत्काळ मासे विक्रेत्यांना मार्केटबाहेर बसण्याची परवानगी दिली. यावेळी पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, युवक कार्याध्यक्ष शहाबाज पटेल उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »