Press "Enter" to skip to content

बळीराम नेटके यांची पुन्हा खारघर शहर अध्यक्षपदी निवड !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्यावर पुन्हा खारघर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांनी बळीराम नेटके यांना शुक्रवारी खारघर येथील कार्यकर्ता बैठकीत पत्र दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्यध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे, उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल फारुख पटेल, अजिनाथ सावंत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल,विजय मयेकर,रणजीत नरुटे, बबनराव पवार, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम,विद्यारानी सकटे आदी उपस्थित होते.
पक्षश्रेष्ठींनी माझी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर अध्यक्ष पदी नियुक्ति केली असून पक्षावाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया बळीराम नेटके यांनी यावेळी व्यक्त केली. बळीराम नेटके हे मागील अनेक वर्षांपासून खारघर शहरात वास्तव्य करीत आहेत. खारघर येथील पांडवकडा धबधबा, स्वप्नपूर्ती ,तसेच अनेक नागरी विकासाचे मुद्दे बळीराम नेटके यांनी हाताळले आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »