Press "Enter" to skip to content

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते `कोरोना योद्धा `सन्मान !

नमो नमो भारतच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराचे आयोजन !

मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा केलेल्या योध्यांचा नमो नमो मोर्चा भारतच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते कोरोना योध्यांना सन्मानित करण्यात आले. नमो नमो मोर्चा भारतचे केंद्रीय संघटन सहमंत्री तथा भाजपा ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आर के दिवाकर व नमो नमो मोर्चा भारतचे उत्तर भारतीय प्रदेश संघटन मंत्री सुशील कुमार जोशी यांच्या पुढाकाराने सदर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते डॉ चंद्रा बोरा, प्रेमा भोपी, प्रो सगुन गौर, श्री भोपी, जगजीवन कन्याल, संजय भोसले, संतोष शर्मा, सुशील कुमार जोशी, अमित अग्रवाल, अभिषेक भोंपी, प्रवीण जोशी, नवीन भट्ट आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आर के दिवाकर व सुशील कुमार जोशी यांचा देखील कोरोना योद्धा म्हणून विशेष सन्मान केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »