नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मध्ये विविध विकासकामे करण्याच्या अनुषंगाने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी दौरा केला. स्थानिक नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या विशेष पुढाकाराने सदर पाहणी दौरा संपन्न झाला.
स्वतंत्र युवक मित्रमंडळ सेक्टर १२ एफ लाईन यांच्या विनंतीवरून मूलभूत सुविधा भेटण्यासाठी आमदार प्रशांत ठाकुर यांचा पाहणी दौरा आयोजित केला.
सेक्टर १२ एफ लाईन मधील रहिवाशांना वारंवार होणारा लाईट, पाणी आणि चांगलं रस्त्याचा त्रास, या संदर्भात स्वतंत्र्य युवा मित्र मंडळाच्या सदस्यांनी नागरिकांसोबत नगरसेविका हर्षदा, अमर उपाध्याय यांच्या कडे समस्या मांडली. हर्षदा उपाध्याय तात्काळ या गोष्टीचा पाठपुरावा करून आमदार प्रशांत ठाकूर यांना कळवले असता आमदार प्रशांत ठाकूर यांनी लगेचच पहाणी दौर्याच्या माध्यमातून लवकरात लवकर सिडको प्रशासना कडुन काम करुन घेण्याचे आश्वासन दिले.
सेक्टर १२ एफ लाइनला भेट देऊन एफ लाईनच्या नागरिकांसोबत प्रभाग सभापती अनिता पाटील, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नगरसेवक हरेश केणी,खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, दिपक शिंदे , कीर्ती नवघरे, युवा अध्यक्ष विनोदजी घरात, श्री दिलीप जाधव उपस्थित होते.
कोकण दर्पण.
कोकण दर्पण.





