पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील अनेक वर्षांपासून रखडलेला तळोजा रेल्वे भुयारी मार्ग अखेर रेल्वे प्रशासनाने खुला केला. मागील चार महिन्यापासून पाठपुरावा केल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रेल्वे प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर करून वाहतुकीसाठी खुला केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल आणि कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तळोजा भुयारी मार्ग जनतेसाठी खुला झाल्याने राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. या कामासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, कार्याध्यक्ष डॉ शिवदास कांबळे,जेष्ठ नेते फारूक भाई पटेल, जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सावंत,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विजय मयेकर, खारघर अध्यक्ष बळीराम नेटके, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज पटेल,उपाध्यक्ष विलास खरतमोल, उपाध्यक्ष तुषार मानकर,सरचिटणीस प्रणय परब यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण दर्पण





