पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मधील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सिडको प्रशासनाने सुरू केले आहे. माजी सभापती तथा नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर कामाला यश आले आहे.
प्रभाग 5 येथील रस्त्याच्या दुरुस्ती विषयी शत्रुघ्न काकडे यांनी सिडको कडे सतत पत्रव्यवहार केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश येऊन सेक्टर 4 व सेक्टर 3 येरळा हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
खारघर शहर उपाध्यक्ष संजय घरत , राजेंद्र मांजरेकर , अजय माळी , अक्षय पाटील ,शुभम म्हात्रे , आणि सेक्टर 4 व सेक्टर 3 मधील असंख्य रहिवासी उपस्थित होते.
कोकण दर्पण.





