Press "Enter" to skip to content

जनआंदोलनाच्या दणक्याने सिडकोला खडाडून आली जाग !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर मधील विविध नागरी सुविधांसाठी तीव्र जनआंदोलन केल्यानंतर सिडको प्रशासनाला जाग आली आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर खारघर मधील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु झाल्याची माहिती पनवेल महापालिकेतील नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी दिली.
खारघर शहरातील रस्ते , गटारे , विद्युत दिवे , पदपथ , गटारे यांच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम खोळंबला आहे. सिडको अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी शेकडो रहिवाशांसमवेत खारघर येथील सिद्की कार्यालयावर आपला मोर्चा वळविला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी नागरी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा वेळ मारण्याचा प्रयत्न केला. मात्र , पुढील आठ दिवसात नागरी कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी दिल्यानंतर झोपलेले सिडकोचे अधिकारी खाददुन जागे झाले. गुरुवारी खारघर सेक्टर ३ व ४ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याची माहिती नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी दिली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »