पनवेल, कोकण दर्पण : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर हे महत्वाचे शहर आहे. खारघर शहराचा विकास झपाट्याने वाढत आहे. त्याप्रमाणात शहराच्या सुरक्षेची जबाबाबदारी देखील वाढत आहे. वाढत्या खारघर शहराची कायदा-सुव्यवस्था परखडपणे अबाधित राखणार, अशी प्रतिक्रिया खारघर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
खारघर शहर मोठ्या झपाट्याने वाढतंय, त्यामुळे शहरातील अतिसंवेसनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खारघर शहरात विविध जातीधर्माचे लोक राहतात,त्यामुळे इथे सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची भावना शत्रुघ्न माळी यांनी व्यक्त केली.
कोकण दर्पण.





