Press "Enter" to skip to content

बेलपाडा गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार महेश बालदी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : जेएनपीटी बंदराच्या विकास निधीतून दास्तान फाटा ते बेलपाडा गावातील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचा शुभारंभ गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडत आहे.याचा आम्हा लोकप्रतिनिधीना निश्चित अभिमान वाटत असून बेलपाडा गावाच्या विकासासाठी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले.
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या बेलपाडा गावाच्या रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली होती.या मागणीची दखल जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने घेऊन जेएनपीटीने सदर रस्त्याच्या नव्याने करण्यात येणार असलेल्या डांबरीकरणाच्या कामांसाठी ०१ कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्या विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदी व गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता अजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जेएनपीटी बंदराचे मा. ट्रस्टी रवि पाटील, पंकज पंढरीनाथ पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »