Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये ई टॉयलेटचे भूमिपूजन !

नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर येथे बांधण्यात येणाऱ्या ई टॉयलेटचे भूमिपूजन स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.
खारघर परिसरात ई टॅलेंट असावेत अशी मागणी रहिवाशांनी केली होती, त्यानुसार पनवेल महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती, अशी माहिती नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी दिली. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक ५ खारघर सेक्टर ४ येथे ई टॉयलेट सुरु केल्यानंतर खारघर सेक्टर ७ येथे आणखी एका ई टॉयलेटचे भूमिपूजन केल्याची माहिती युवानेते अमर उपाध्याय यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर , महापौर डॉ कविता चौतमल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांच्या सोयीसाठी सदर ई टॉयलेट सुरु करीत असल्याचे नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी सांगितले. यावेळी अनेक रहिवाशी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »