खारघर शहर पत्रकार संघाच्या वतीने हर्षल भदाणे यांनी दिल्या शुभेच्छा !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी शत्रुघ्न माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माळी यांनी आपल्या पदाचा पदभार शनिवारी सकाळी स्वीकारला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी आपल्याकडील पोलीस ठाण्याच्या पदभार शत्रुघ्न माळी यांच्याकडे सुपूर्द केला. शत्रुघ्न माळी हे पोलीस अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहेत, पनवेल शहर पोलिस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया करून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली होती. माळी यांची खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर असंख्य समाजसेवक, राजकीय नेते, पत्रकार मंडळींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. खारघर शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे सचिव हर्षल भदाणे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना शुभेच्छा दिल्या.
कोकण दर्पण.





