Press "Enter" to skip to content

भाजपा खारघर-तळोजा मंडल सोशल मीडिया अध्यक्षपदी अजय माळी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपा खारघर-तळोजा मंडल सोशल मीडिया अध्यक्षपदी अजय माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी, खारघर-तळोजा मंडल कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर जाहीर केली.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाशजी कोळी, सोशल मीडिया प्रदेश सदस्या चांदणी अवघडे,जिल्हा सह संयोजिका मोना अडवाणी, खारघर-तळोजा मंडल सरचिटणीस दीपक शिंदे , उद्योग आघाडी संयोजक राजेंद्र मामा मांजरेकर आदी उपस्थिती होते.

अजय माळी हे मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेल मध्ये त्यांचे चांगले योगदान आहे. सोशल मीडियातील त्यांची सतर्कता पाहून भाजपने त्यांच्यावर खारघर तळोजा मंडल अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »