Press "Enter" to skip to content

नमो भारत वेबसाईटचा सोमाभाई मोदी यांच्या हस्ते शुभारंभ !

नवी मुंबई, कोकण दर्पणवृत्तसेवा : नमो नमो मोर्चा भारतच्या वेबसाईटचा शुभारंभ नमो भारतचे सल्लागार सोमाभाई मोदी यांच्या हस्ते शुभारंभ नुकताच संपन्न झाला. गुजरात येथील वडनगर येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. नमो नमो मोर्चा भारत वेबसाईटमुळे संघटना आणखी मजबूत होणार असून संपूर्ण देशात कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम वेगाने होईल, असे प्रतिपादन सोमाभाई मोदी यांनी यावेळी केले. वेबसाईट उदघाटन प्रसंगी देशातील अनेक कार्यकर्ता यु ट्युबद्वारा जोडलेले होते, अशी माहिती राष्ट्रीय संघटन सहमंत्री राधेश कुमार दिवाकर यांनी दिली.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय संघटन महामंत्री विजय हटवार, राष्ट्रीय मुख्य समन्वयक सोपान उंडे पाटील, राष्ट्रीय संघटन सहमंत्री राधेश कुमार दिवाकर, राष्ट्रीय सोशेल मीडिया प्रभारी विजय जोंधळे पाटील , महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री सुर्यप्रकाश सिंह , निलेश सिंह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सत्यप्रकाश सिंह राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय महिला महामंत्री श्रीमती राजश्री कक्कर , पंकज गुप्ता राष्ट्रीय संगठन मंत्री, संजय मिश्रा राष्ट्रीय मंत्री, प्रदेश प्रवक्ता संदीप महाराज दीक्षित आणि महाराष्ट्र प्रदेश विदर्भ प्रांताध्यक्ष विशाल भोसले , प्रोकोहॅट टेक्नॉलॉजी नागपूरचे निखिल अपराजित , सर्व प्रदेशप्रमुख, प्रदेश कार्यकारिणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »