Press "Enter" to skip to content

पनवेल मनपा स्थायी समिती सभापती निवडणुक ! भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांचा अर्ज दाखल !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महापालिकेच्या २८ ऑक्टोबरला होणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांचा अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला आहे. 

        अर्ज दाखल करताना महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, यांच्यासह विविध प्रभाग समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

        माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  महापालिकेत भाजप रिपाईची एक हाती बहुमत असल्याने शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विद्यमान प प्रवीण पाटील यांच्या एक वर्षाच्या सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने कोरोनाच्या पार्शवभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे.  

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »