नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सीबीडी- बेलापूर सेक्टर ८ येथील समाज मंदिर इमारतीचे भूमिपूजन रविवारी विजयादशमी व दसऱ्याच्या मुहूर्तावर संपन्न झाले. स्थानिक नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांच्या अथक प्रयत्नातून समाजमंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे. दोन मजली बांधण्यात येत असलेल्या समाज मंदिर इमारतीसाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.पुढील नऊ महिन्यात समाज मंदिराची इमारत नागरिकांच्या वापरासाठी खुली राहणार आहे. सदर इमारतीत शैक्षणीक, सामाजिक आणि सार्वजनिक हिताचे कार्यक्रम तसेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकनगरसेविका सुरेखा नरबागे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १०३, सीबीडी- बेलापूर येथे समाज मंदिर बांधावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुरेखा नरबागे सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होत्या. तदनंतर, पालिकेने सीबीडी- बेलापूर सेक्टर ८ रमाबाई आंबेडकरनगर येथे समाजमंदिरासाठी २० क्रमांकाचा भूखंड आरक्षित केला होता. रविवारी सदर कामाला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ नेते साबू डॅनियल ,स्थानिक नगरसेविका सुरेखा नरबागे, समाजसेवक अशोक नरबागे यांच्या शुभहस्ते तसेच स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत समाजमंदिर इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले.
माझ्या प्रभागातील जनतेला दिलेला समाज मंदिर इमारत बांधण्याचा शब्द मी पळाला आहे, माझ्या माझ्या सामाजिक कामासाठी , जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या प्रभागाची सेवा करताना काहीजण टीका करतात , राजकारण करतात. मात्र , नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलेला शब्द पाळलेला आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते साबू डॅनियल यांनी व्यक्त केली. २०१५ सालापासून आमचे नेते साबू डॅनियल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे केले, थोड्या प्रमाणात जी कामे राहिली असतील ती देखील पूर्ण करणार, असा विश्वास सामाजिक नेते अशोक नरबागे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी समाजसेवक रमेश कोरे तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोका दर्पण.





