Press "Enter" to skip to content

नमो नमो मोर्चा राष्ट्रीय संघटन सहमंत्रीपदी आर के दिवाकर यांची नियुक्ती !

पनवेल , कोकण दर्पण : भाजपचे नेते आर के दिवाकर यांची नमो नमो मोर्चाच्या राष्ट्रीय संघटन सहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री दिवाकर हे नमो नमो मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. श्री दिवाकर यांची कार्यप्रणाली पाहून त्यांच्यावर नमो नमो मोर्चा राष्ट्रीय संघटन सहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय संयोजक सत्यप्रकाश सिंह ,राष्ट्रीय मुख्य समन्वयक सोपं पाटील, राष्ट्रीय संघटन महामंत्री विजय हटवार यांनी आर के दिवाकर यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री दिवाकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आर के दिवाकर हे भाजपा महाराष्ट्र ओबीसी सेलचे सचिव देखील आहेत. ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्यांची लढाई सुरु आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री दिवाकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »