Press "Enter" to skip to content

एमआयएम विध्यार्थी संघटनेच्या महासचिवपदी शहानवाज खान !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : एमआयएम प्रणित विद्यार्थी आघाडी महाराष्ट्रा प्रदेश महासचिव पदी शहानवाज खान यांची निवड करण्यात आली. पनवेल येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खान यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी माजी आमदार वारीस पठाण,फैयाज अहमद,महासचिव शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी,सानीर सय्यद,मझर पठाण आदी मान्यवर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते.

आज देशात असो किंवा राज्यात सर्वच स्तरावर विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीतुन एक चांगल्या प्रकारे नेतृत्व पुढे येत आहे.आणि येणाऱ्या दिवसात या विद्यार्थ्यांच्या चळवळीला एम एम आय आणखी बळकटी देईल त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोकण असो किंवा नवी मुंबई येथील एक पण कॉलेज शिल्लक नसेल की जीथे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची सिद्यार्थी आघाडी लढताना दिसेल , अशी प्रतिक्रिया महासचिव शहनावाज खान यांनी यावेळी दिली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »