Press "Enter" to skip to content

नमो नमो मोर्चाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे प्रामाणिक कार्य करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनमध्ये समारंभपूर्वक ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला.
त्यानिमित्ताने भाजप महाराष्ट्र ओबीसी सेलचे सचिव ,नमो नमो मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष आर के दिवाकर आणि नमो नमो उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष शर्मा यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »