Press "Enter" to skip to content

चिपळूण येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा – काँग्रेसची मागणी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका काँग्रेस अनुसूचित विभागाने चिपळूण येथील ततुरंबव येथील पीडित श्रीधर व अजित पालशेतकर कुटुंबीयांची भेट घेतली. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोषींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

काही दिवसांपूर्वी येथील ग्रामदेवता श्री शारदा देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील बैठकीत श्रीधर व अजित पालशेतकर यांना जातीवाचक शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने दखल घेत या विभागाचे प्रदेश संयोजक सुनील सावर्डेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, चिपळूण तालुका अध्यक्ष सूर्यकांत चिपळूणकर आदींनी शनिवारी श्रीधर व अजित पालशेतकर कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा आपल्याला पाठिंबा राहील. भविष्यात आपल्याला जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल, तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही सुनील सावर्डेकर यांच्यासह शिष्टमंडळाने दिली. यानंतर सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाची आपण दखल घ्यावी अशी मागणी केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी स्मिता सावर्डेकर, अनंत सावर्डेकर, रामदास कडवेकर, जितेंद्र सावर्डेकर, श्रद्धा कडवईकर, योगेश पवार आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »