पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सहसचिव प्रसाद पाटील यांची महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी रविवारी प्रसाद पाटील यांच्यावर पनवेल शहर जिल्हा महासचिव पदाची जबाबदारी दिली.
प्रसाद पाटील हे मागील अनेक वर्षांपासून पनवेल महापालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत असताना एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्र आणि विशेषतः तळोजा विभागात प्रसाद पाटील यांची विशेष कामगिरी आहे. तळोजा मधील विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची पालिका आणि सिडको प्रशासनाशी सततची लढाई सुरु आहे. तळोजामधील पाणी प्रश्न , तळोजा रेल्वे भुयारी मार्ग असे अनेक प्रश्न प्रसाद पाटील हाताळत आहेत. प्रसाद पाटील यांची कार्यपद्धती पाहून त्यांची पनवेल शहर जिल्हा महासचिव पदी बढती करण्यात आली आहे.
कोकण दर्पण.





