Press "Enter" to skip to content

प्रज्ञा चव्हाण यांची राष्ट्रवादी युवती पनवेल जिल्ह्याध्यक्षपदी निवड !

प्रियांका सोनार यांची नवी मुंबई निरीक्षकपदी निवड !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षपदी प्रज्ञा चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई निरीक्षक म्हणून प्रियांका सोनार तर रायगड जिल्हाध्यक्षपदी ऍड सायली दळवी यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी मंगळवारी सदर नियुक्त्या जाहीर केल्या. ठाणे जिल्हाध्यक्षपदी पल्लवी जगताप, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून दिशा दाभोळकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्षपदी मिता परब, सांगली महानगर जिल्हाध्यक्षपदी अमृता चोपडे, सातारा जिल्हाध्यक्षपदी पूजा काळे तर सातारा कार्याध्यक्षपदी सुजाता भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

कोकण दर्पण