पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा तळोजा विभागाच्या वतीने विद्युत वितरण व वीज बिलातील समस्या याबाबत वीज कंपनी प्रशासनाशी नागरिकांच्या सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसचिव प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर उपक्रमांमध्ये सहाय्यक अभियंता रणजीत देशमुख यांनी केलेल्या सूचनां नमूद करून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.लवकरात लवकर विभागातील महावितरण संबंधीच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे यांनी जमलेल्या सामाजिक कार्यकर्ते व वीज ग्राहकांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमास पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष सुनिल ढेंबरे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मंगेश नेरळकर, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आर एन यादव, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब लबडे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसचिव कृष्ण मर्ढेकर, पनवेल विधानसभा सचिव प्रभाकर फडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खारघर शहराध्यक्ष सुरेश रांजवन, एमआयडीसीमधील पदाधिकारी अनिल डोंगरे, विशाल पाटील, पनवेल युवा कार्याध्यक्ष प्रदीप पाटील, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक सचिव नारायण गायकवाड, प्रभाग क्रमांक पाच चे अध्यक्ष महेश राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये हाजी भाई सलीम, निसार उलडे, नासिर भाई सुर्वे, चंपा विश्वास, रेहान खान, नजमा सय्यद, तपन विश्वास नितीन पाटील, साजन सिंग इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी जनतेची बाजू वीज वितरण पदाधिकारी यांच्यासमोर प्रकर्षाने मांडली.
कोकण दर्पण.





