Press "Enter" to skip to content

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या – आदी आंबडेकर आंदोलन संघटनेची मागणी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे बहुजन समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी, अशी मागणी आदी आंबडेकर आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुभाष विरोचन यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठ मंडळाने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, आदी आंबडेकर आंदोलन संघटनेच्या वतीने नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सदर घटनेचा निषेध करण्यात आला.

हाथरस येथील बहुजन समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. यु पी मधील योगी सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हे प्रकरण दाबून टाकण्याची संशयास्पद धडपड नक्कीच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. केवळ आरोपी एका जमातीचे आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालण्यासाठी, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून, पीडित मुलीच्या छिन्नविछिन्न झालेल्या शरीराचे दहन, पोलिसांकडून घाईघाईने करणे, तिच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवून उरकून घेण्यात आले, अशा शब्दात सुभाष विरोचन यांनी हल्लाबोल केला.


कोकण दर्पण