Press "Enter" to skip to content

खारघरमधील विकासकामांसाठी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी घेतली सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर मधील विविध विकासकामांसाठी पनवेल महापालिकेतील खारघरमधील नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांची भेट घेतली.

सीबीडी येथील सिडको भवन मध्ये भेट घेऊन निवेदन विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर भेटी दरम्यान प्रभाग क्रमांक ६ मधील नवीन व प्रलंबित असलेल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी झालेल्या भेटीमुळे माझ्या प्रभागा मधल्या प्रलंबित राहिलेली विकास कामे लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »