नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७२ हजार माथाडी कामगारांचे काय होणार? असा खडा सवाल करत नवी मुंबई आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा काळी पट्टी बांधून जाहीर निषेध केला. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज वाशी चौकात कृषी विधेयकाच्या विरुद्ध आप`ने निषेधाचे धरणे आंदोलन केले.
आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थिती लावली. केंद्र सरकारने नुकत्याच ज्या असंवैधानिक पद्धतीने, लोकशाहीची हत्या करुन शेतकऱ्यांच्या विरोधात व कारपोरेटच्या हिताची तीन विधेयक मंजूर केले. सरकारी संस्थांना पहिले वाऱ्यावर सोडून ,त्यांना खिळखिळी करणे आणि मग त्याचे विलगिकरण करून ती खाजगी संस्थाना विकणे हाच व्यवसाय सध्या सरकारने सुरु केलाय. “एक तरी सरकारी संस्था दाखवा जिथे, ह्या सरकारने दयेदीप्यमान कामगिरी करून सरकारी सेवा उत्कृष्ट प्रतीच्या बनवल्या आहेत ” असा सवाल राष्ट्रीय नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला.
सरकाने शेतकरी बिला संदर्भात चर्चेविना केलेली उठाठेप शंकेची वाटते, कित्येक वर्षांपासून स्वामिनाथन समितीची मागणी अजून हि अमलात आलेली नसताना सरकारने हे नवीन विधेयक ज्या पद्धतीने मंजूर केले हे खरोखरच लोकशाहीचा पाठीत खंजर खुपण्यासारखे आहे. एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे किसान विरोधी विधेयकाचा आम आदमी पक्षाने राज्यभर निषेध करत आहे असे मत पक्षाचे नवी मुंबई संयोजक प्रमोद महाजन यांनी मांडले आणि शेतकरी,माथाडी कामगार आणि सामान्य नागरिकांच्या या लढाईत आप खांद्य्या ला खांदा लावून उभी राहील आणि कायदेशीर लढाई लढेल असे आश्वासन दिले.
आंदोलनाला नवी मुंबई च्या उपसंयोजक मलिका सुधाकर, महिला अध्यक्ष्य प्रीती शिंदेकर,उपाध्यक्ष सुलोचना शिवानंद, न्यायिक कमिटीच्या सेकेरेटरी सुवर्ण जोशी ,रूपक तिवारी,ताहीर पटेल, झाकीर कुरेशी, चिन्मय गोडे, सुमीत कोट्यान,अवंतिका माथूर, मनमोहन सिंग, हरमीत सिंग, रमेश गुप्ता,अब्दुल अजीज आणि इतर कार्यकर्त्यांते सहभागी झाले होते. झाले.
कोकण दर्पण.