पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल मनपा क्षेत्रातील खारघर मधील घरकूल आणि स्पॅगेटी सोसायतील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने सदर ओपन जीमचे लोकार्पण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी ओपन जिमची उभारणी घरकुल आणि स्पेगेटी सेक्टर १५ खारघर येथील मैदानामध्ये करण्यात आली आहे. कोरोना महामारीमध्ये नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. रोज शरीराचा व्यायाम झाला पाहिजे, या उद्देशाने ओपन जिमची उभारणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ओपन जिमचा शुभारंभ करण्यात आला. खारघर प्रभाग क्रमांक सहाचे स्थानिक नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या नगरसेवक निधीतुन ओपन जिम बांधण्यात आली आहे.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर महिला सरचिटणीस योगिताजी कडू , विनया विणरकर, लोखंडे मॅडम, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद मोकाशी, मोहनजी भुजवडकर, के.डी. पी सिंग, रामचंद्र पाटील, बबन मोहिते व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कोकण दर्पण.