पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या तळोजा रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कोर्टात गेला आहे. सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सदर भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत तत्काळ दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
मागील चार वर्षांपासून तळोजा फेज 1 येथील भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सदर काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. अध्यापही काम सुरू आहे. सध्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे भुयारी मार्गाने तलावाचे रूप धारण केले आहे. सदर प्रश्न सोडविण्यासाठी तळोजा परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सिडको आणि रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा देखील केला. मात्र, भुयारी मार्गाचा प्रश्न खितपत पडला आहे. मंगळवारी शहबाज पटेल यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते फारुख पटेल उपस्थित होते.
सदर प्रश्नांची गंभीरपणे दखल घेवून भुयारी मार्ग जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी शहबाज पटेल यांनी यावेळी केली.
कोकण दर्पण.