Press "Enter" to skip to content

चित्रपट क्षेत्रातील कामगारांसाठी ५०० ऑक्सिजन सिलेंडर भेट !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपा चित्रपट युनियन संलग्न भारतीय मजदूर संघाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के.दिवाकर यांनी चित्रपट तथा कला क्षेत्रातील कामगारांसाठी ५०० ऑक्सिजन सिलेंडर व एक धनादेश सुपूर्त केला.यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा, भाजपा चित्रपट युनियन व कामगार आघाडी अध्यक्ष संदीप घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण