पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेतील जेष्ठ नगरसेवक तथा माजी सभापती अभिमन्यू पाटील यांनी गुरुवारी खारघर येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि ग्लोबल एव्हीएशन अकॅडमीला सदिच्छा भेट दिली.
कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. ग्लोबल स्कूलला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे चेअरमन सुरज म्हात्रे, संपादक संजय महाडिक, फिनिक्स युनिव्हर्सल स्कूलचे चेअरमन किरण गजेवार उपस्थित होते.
कोकण दर्पण.