-: करण महाडिक :-
मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून घाटकोपर येथील सामाजिक संस्थांनी विशेष पुढाकार घेत मूर्ती विसर्जनासाठी स्व : खर्चाने कृत्रिम तलाव बांधला आहे.
शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रामदास शिंगाडे व माता रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संलग्न जनसेवा वेल्फेअर संघाचे अध्यक्ष चंदन निकाळजे यांच्या पुढाकाराने घाटकोपर येथे माता रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीमधील सर्व गणेश भक्तांसाठी आणि नागरिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कोविड १९ या महाभयंकर संसर्ग रोगाचे सावट असताना गणेश उत्सवात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन हे गर्दी टाळून सुसज्ज व मांगल्य पूर्ण वातावरणात व्हावे, कोणालाही कोरोनाची बाधा हिवू नये,शासन, प्रशासन, महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांचा ताण कमी करावा , या सामाजिक उद्देशाने संस्थेच्या आवारात स्व खर्चाने कृत्रिम तळे निर्माण करून श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे व्यवस्थापन केले आहे.
कोकण दर्पण