पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर, सेक्टर १५ येथील नागरिकांसाठी मोफत रॅपिस अँटीजेन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांची अँटीजेन टेस्ट केल्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून अन्यधान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकेश गर्ग यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी भाजप खारघर महिला सरचिटणीस योगिता कडू , सौ विनेरकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन भुझवढकर, रामचंद्र पाटील, विजय हरकोंड, व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण दर्पण.